घडामोडी

इयत्ता चौथी हसत खेळत शिष्यवृत्ती अभिरूप परीक्षा २०१४ मध्ये
केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

अभिनंदन!!!
   ९ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इयत्ता चौथी हसत खेळत अभिरूप परीक्षे मध्ये सातारा जिल्हास्तरीय निवड यादीमध्ये आमच्या केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे यश!!

प्रणव तानाजी जगदाळेकु.चिन्मयी महेश भिसे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवानीनगर (पुसेगाव)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुसेगाव नं १
गुण २७४गुण २७४
जिल्ह्यात पाचवाजिल्ह्यात पाचवी


जिल्हा परिषद भवानीनगर शाळेची शैक्षणिक सहल

भवानीनगरच्या विद्यार्थ्यांनी केला सिंहगड सर!

दि. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवानीनगर शाळेची सहल सिंहगड, खडकवासला धरण, पुणे दर्शन व प्रतिबालाजी या ठिकाणी गेली होती. सिंहगड सारखा प्रचंड अवघड असलेला किल्ला इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी यशस्वीपणे चढला. नागपूरच्या पर्यटकांनी या मुलांचे कौतुक करत खाऊसाठी मुलांना पैसे दिले. अनेक पर्यटकांना मुलांचे खूप कौतुक वाटले. आमच्या शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी दीपक मधुरकर या सर्वात छोट्या मुलीने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने हा किल्ला सर केला. तिचे विशेष कौतुक सर्वांनी केले.



जिल्हा परिषदेच्या भवानीनगर शाळेत

डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन


      पुसेगाव दि. १२/१२/१३ : जि. प. प्राथमिक शाळा, भवानीनगर (पुसेगाव) येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई फडतरे यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन खटाव तालुक्याच्या सभापती सौ. सोनाली खैरमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी सभापतींनी संगणकाचे महत्व स्पष्ट करून डिजिटल क्लासरूमचा लाभ जि. प. शाळांना मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे असे स्पष्ट करून त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या धडपडीचे कौतुक केले. या शाळेतील उपशिक्षक श्री. संजय गोरे यांनी तयार मुलांसाठी तयार केलेले सॉफ्टवेअर व पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स यांचे प्रदर्शन शिक्षणमहोत्सवात करण्याविषयी सांगितले.

      जि. प. सदस्या सौ. वैशालीताई फडतरे यांनी उपक्रमशील सातारा जिल्हा परिषदेच्या डिजिटल क्लासरूमचे कौतुक करून विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा असे सांगितले. त्यांनी स्वतःच्या फंडातून या शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी पाच लाखांचे अनुदान देण्याचे जाहीर केले.

      या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य श्री. मोहनराव जाधव, पुसेगावच्या सरपंच सौ. शुभांगी जाधव, उपसरपंच श्री. संतोष जाधव, वर्धनगडचे केंद्रप्रमुख श्री. प्रमोद जगदाळे, अंगणवाडी पर्यवेक्षका सौ. टकले मॅडम, अभियंता श्री. चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक, माता पालक संघ यांचे अध्यक्ष, सदस्य व शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. विष्णू पचांगणे, सूत्रसंचालन श्री. अजित चव्हाण आणि आभार सौ. आशा बारसिंग यांनी मानले.

4 comments:

  1. खुपच छान सर.आपले अभिनन्दन व आभार.

    ReplyDelete
  2. खूप छान सर

    ReplyDelete
  3. शाळेतील सर्व शिक्षकांच्या धडपडीचे मनापासून कौतुक. डिजिटल क्लासरूमचा लाभ यापुढे मुलांना लाभेल ही मोठी आनंदाची गोष्ट ॥ अभिनंदन

    ReplyDelete